तालुका प्रतिनीधी
पातूर – वाशिम जिल्हातील मालेगांव तालुक्यातील मुंगळा या गावात रविवारी रात्री अतिवृष्टी झाल्याने पहीलेच मेडशी येथील तलाव व मोरणा धरण शंभर टक्के भरलेल्या जलसाठात मोठी वाढ झाली या मुळे पातूर तालुक्यातुन वाहणार्या मोर्णा नदीला पुर आल्याने पातूर तालुक्यातील सात ते आठ गावाना या पुराचा फटका बसला असुन मोर्णा नदीचे पाणि आस्टुल, पास्टुल, कोठारी बु, कोठारी खु, आगिखेड, खामखेड , पार्डी, धोधानी, कोसगांव शेतात शिरल्याने तालुक्यातील सहाशे ते आठशे हेक्टर शेत जमीनीवरील पिकाना या पुराच्या पाण्याचा फटका बसला असुन काही काळ काही गावाचा संपर्क सुध्दा तुटला होता.पातूर तालुक्यात पाऊस नसताना मोर्णा नदीला आलेल्या पुरामुळे शेतात गेलेल्या शेतकरी व नदीकाठच्या गावातील नागरीकाची ताराबळ उडाली होती. मोरणा नदीला पूर आल्याची माहिती मिळताच तहसीलदार राहुल वानखडे, कृषी अधिकारी मिलिंद शेट्टे, मंडळ अधिकारी शेपाली देशमुख, तलाठी डाबेराव, ड्रायव्हर मुजाहिद खान यांनी घटनास्थळी पोहचून नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी रहावे असे आवाहन करण्यात आले.
