पातुर तालुक्यातील तुलंगा बू येथील रहिवासी दिनेश भीमराव हातोले हे रोजगार हमी योजनेचे पैसे दुसऱ्या मजुरांना मिळाल्याबाबत व रोजगार हमी योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीवरून तुलंगा येथे आमरण उपोषणास बसले होते. या उपोषण मंडपात वंचित आघाडीचे सुधाकर कराळे यांनी चर्चा करून या योजनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचार व मजुरांना न मिळालेल्या पैशाचा मोबदला याबाबत चर्चा करून उपोषणकर्त्याचे समाधान केले यावरून उपोषणकर्ते दिनेश भीमराव हातोले यांनी 17 फेब्रुवारी च्या रात्री एक वाजता लिंबू शरबत घेऊन उपोषण सोडले. यावेळी वंचित आघाडीचे सुधाकर कराळे, सरपंच खुशाल तायडे, सचिन गवळी, गजानन महल्ले, मनीष भारसाकळे व चांन्नी पोलीस स्टेशनचे कर्मचारी ASI पद्माकर, एएसआय व्यवहारे हे उपस्थित होते
