पातूर प्रतिनिधी :- २१ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये उत्कृष्ट सादरीकरणाचे द्वितीय तसेच तब्बल ७ वैयक्तिक बक्षीसे पटकावित एज्युविला पब्लिक स्कूल पातुर च्या विद्यार्थ्यांनी अकोल्याच्या इतिहासात मानाचा तुरा खोवला आहे सोमवार दिनांक ५ मे २०२५ ला साई सभागृह नागपूर येथे बक्षीस वितरणाचा दिमाखदार सोहळा नुकताच पार पडला.या नाट्य स्पर्धेत एजुविला पब्लिक स्कूलची जगाओ मेरा देश व इथे बाळ मिळतात अशी दोन नाटके सादर करण्यात आलीत त्यापैकी जगाओ मेरा देश या नाटकाला विभागीय स्तराचे दुसरे पारितोषिक प्राप्त झाले असेच इथे बाळे मिळतात या नाटकातील बालकलाकार काव्या खांबालकर हिला मानाचे रोप्य पदक मिळाले.उपरोक्त समिती संघातील कलाकारांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.यामध्ये जगाओ मेरा देश या नाटकाला द्वितीय क्रमांक,काव्या खांबालकर हिला रौप्यपदक, रुद्र कुकडकर व अष्टिका ठाकरे यांना गुणवत्ता प्रमाणपत्र तसेच दिग्दर्शनासाठी ओंकार दामले,केसर चोपडेकर नेपथ्य अनुराधा कराळे रंगभूषा या सर्व विजेत्यांना मान्यवरांचा हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
नाटकामुळे आत्मविश्वास,भाषिक विकास, संवाद कौशल्ये, समाजशीलता, सृजनशीलता,सांघिक भावना आणि नेतृत्व कौशल्य हे गुण विकसित होतात.म्हणूनच शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या निलेश गाडगे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून अशा अनेक शैक्षणिक व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास प्रोत्साहित करतात.याप्रसंगी शाळेच्या अध्यक्षा निर्मलाताई गाडगे व मुख्याध्यापिका यांनी सर्व विद्यार्थ्यांचे तसेच तंत्रज्ञ मंडळीचे भरभरून कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.
