पातूर प्रतिनिधी (संगीता इंगळे)
महिला व बालक यांच्या सुरक्षा संबंधाने जनजागृती पर सप्ताह चे आयोजन मा. श्री. संदीप घुगे पोलीस
अधीक्षक अकोला यांच्या संकल्पनेतून, श्री अभय डोंगरे अपर पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शना खाली डॉ. एच एन सिन्हा महाविद्यालय येथे दि. ४/१२/२०२३ चे १२/०० वाजता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले
होते.

सदर कार्यशाळा मध्ये महिला व बालक जनजागृती पर व्हिडिओ दाखविण्यात आले आणि नंतर प्रमुख मार्गदर्शक.श्री. अभय डोंगरे अप्पर पोलीस अधीक्षक अकोला, श्रीमती उज्वला देवकर, पोलीस निरीक्षक, भरोसा सेल अकोला, ठाणेदार किशोर शेळके , प्राचार्य किरण खंडारे , प्राचार्य इसाकराही, माजी नगर अध्यक्ष हिदायत खान उपस्थित होते .

यावेळी मुलांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार गोपाल मुकुंदे यांनी प्रास्ताविकातून कायदयाचे बारकावे समजावुन सांगत कायदेविषयक मार्गदर्शन केले, महिला व बालक यांनी आपली सुरक्षा कशी करावी या विषयावर विशेष सुचना दिल्या. त्यांच्यात कायदयाबाबत प्राथमिक ज्ञान देण्यात आले.

समाजामध्ये घडणा-या वाईट घटना व त्या घटना कशा टाळता येतील त्याबाबत विशेष मार्गदर्शन केले.बालविवाह, लैंगिक अत्याचार प्रतिबंध कसा करता येईल यावर योग्य मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाकरीता पातुर येथील, अंगणवाडी सेविका, शांतता कमिटी सदस्य, महिला बचत गट, पोलीस पाटील, सावित्रीबाई फुलेविदयालय, शहाबाबू विदयालय एज्युविला पब्लिक स्,कॉलेज, तसेच
इतर शाळा कॉलेज व पालक वर्गाचे विशेष सहकार्य लाभले. आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक श्री. किशोर शेळके ठाणेदार, पोलीस स्टेशन, पातुर यांनी केले. व कार्यक्रमाचे यशस्वीतेचे करीता पोलीस निरीक्षक श्री. किशोर शेळके ठाणेदार, पोलीस स्टेशन, पातुर तसेच पोलीस अधिकारी व पो. अंमलदार पोलीस स्टेशन पातुर यांनी विशेष परिश्रम घेतले.