पातुर येथील नव्याने निर्माण झालेल्या चार पदरी महामार्गावर आज दिनांक ३ मे रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान वाशिम कडून येणारी Mh 37 V 0511 डस्टर व आकोल्याकडून Mh 30 BL 95 52 ब्रिजा या वाहनांमध्ये समोरासमोर धडक होऊन सहा जण ठार तर तीन गंभीर जखमी झाल्याची माहिती प्राप्त होत.

आहे वाशिम जिल्ह्यातील सरनाईक कुटुंब हे वाशिम कडून आकोल्याकडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या पातुर तालुक्यातील आस्टूल येथील रहिवासी ठाकरे यांच्या वाहनांमध्ये जबर धडक होऊन यामध्ये रघुवीर अरुणराव सरनाईक वाशिम, शिवानी अजिंक्य आमले नागपूर , अस्मिता अजिंक्य आमले नागपूर व आस्टूल रहिवासी अमोल शंकर ठाकरे , सुमेध इंगळे सिद्धार्थ यशवंत इंगळे हे सहा जण या अपघातात ठार झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे जखमी मध्ये पियुष देशमुख सपना देशमुख श्रेयस सिद्धार्थ इंगळे यांच्यावर अकोला येथे उपचार चालू आहे त्यांची तब्येत गंभीर असल्याची माहिती प्राप्त होत आहे अपघात होताच घटनास्थळी पातूर वाशी मोठ्या संख्येने घटनास्थळी पोचून जखमींना ताबडतोब अकोला येथील रुग्णालयात पाठवलेल घटनास्थळी पातुर पोलीस पोहचून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. अपघाताची भीषणता पाहता सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे