जुन्या आठवणीनी केले सुखद.. तर एकमेकांचे दुःख उचलून घेतले अलगद..
पातूरच्या शिवारात सजली गप्पांची मैफल
पातूर प्रतिनिधी:-तब्बल तीस वर्षानंतर एकत्र आलेल्या मित्रांचा मेळा पातूरच्या शिवारात रंगला एकमेकांची सुख दुःख वाटत जुन्या जाग्या झालेल्या आठवणींनी सर्वाना सुखद आनंदाचा सुखद अनुभव दिला पातूर येथिल वसंतराव नाईक विद्यालयात शिक्षण घेतलेल्या १९९७ च्या सत्रातील विद्यार्थी स्कुल कट्टा ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आले.त्यांनतर प्रत्येकानी एकमेकांशी संपर्क साधत आपल्या वर्ग मित्रांना ग्रुपमध्ये जोडण्याचा प्रयत्न केला. ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या मित्रानी प्रत्यक्ष भेटण्यासाठी एका स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन केले. पातूर येथिल उमेश फुलारी या वर्गमित्राच्या शेतात हा सोहळा पार पडला. तब्बल तीस वर्षांतर अनेकजण पहिल्यांदाच भेटत होते.त्यावेळी तो भेटीचा विलक्षण आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.अशातच जुन्या आठवणीने मित्रांची मैफल अधिकच रंगली. प्रत्येकानी आपला परिचय दिला. आपले सुख दुःख वाटून घेतले.शाळेतील एकेरी नावाचा उल्लेख करायला एकही मित्र विसरला नाही. हसत खेळत,गंमती जमती करीत जेवणाच्या मेजवानीवर ताव मारला.चाळीशी पार झालेल्या अशा रंगतदार मित्रांच्या या मैफिलीत अनेकांनी आपले आरोग्य सांभाळण्याचा सल्ला सुद्धा दिला.हा स्नेहमिलन सोहळा अधिक ऊर्जा देणारा असल्याचे मत प्रत्येकानी नोंदवले.या स्नेहमिलन सोहळ्यामध्ये अमर वानखडे, संजय काकडे,निशांत गवई, जगदीश चव्हाण,प्रमोद जाधव,गोपाल गाडगे, उमेश फुलारी, अशोक इंगळे, आतिष पवार,सुमेध चक्रनारायण, अभिजित थोरवे,गोपाल खोकले,निलेश गाडगे,हेमंत परमाळे,विजय गाडगे, संदीप धानोकार, गणेश गाडगे,अनिल चव्हाण, संदीप शेवलकार,बाळूभाऊ बगाडे,गोपाल गोतरकार, दत्ता गाडगे,जगदीश निंबोकार आदी मित्रानी आनंद लुटला.