आकोला जिल्ह्यातील पातुर पंचायत समिती ही सर्वात जास्त भ्रष्टाचार असलेली पंचयात समिती असून या पंचायत समितीच्या अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत मध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्याचे अनेक प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला याबाबत रोखठोक न्यूज ने 12 जानेवारी रोजी वृत्त प्रकाशित केले होते की भ्रष्टाचार कर्मचाऱ्यावर कारवाई कोण करणार ? याबाबतचा इम्पॅक्ट झाला असून अकोला जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आलेगाव येथील ग्रामसेवक गजानन डिवरे यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी मध्ये अभिलेख उपलब्ध न करणे, १ ते १३ नमुन्या अद्यावत न करणे , ग्रामपंचायत चा संपूर्ण प्रभाग हस्तांतरणाची कारवाई न करणे, स्वच्छ भारत मिशन व सांडपाणी व्यवस्थापन कामे करण्याबाबत, करवसुली न करणे अशा प्रकारचा ठपका ठेऊन त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबित केल्याचे पत्र आज पातूर पंचायत समिती येथे दाखल झाले. ग्रामसेवक गजानन डीवरे यांच्याकडे राहेर, पिंपळखुटा, शिरला या गावांचा पदभार होता या गावांमध्ये योग्य चौकशी केल्यास मोठे गबाळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही या कारवाई मुळे राहेर, पिंपळखुटा, शिरला या गावांचा पदभार काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे डीवरे याना या अगोदर दोन वेळा निलंबित करण्यात आले होते.
