रिसोड ः पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी महाविद्यालय रिसोड येथील विद्यार्थ्यांना ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमात कंकरवडी येथील शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे फायदे काय? माती परीक्षण करण्याची योग्य पद्धत कोणती? व त्यांनी आपल्याला कसा फायदा होईल याबद्दलची सर्व माहिती दिली विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले की जर आपण आपल्या मातीचे परीक्षण केले तर आपल्याला आधीच कळणार की आपल्या मातीमधील कुठले पोषक द्रव्य किती प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत व नंतर त्यानुसार आपण आपल्या मातीमध्ये कमी असलेले व मातीला गरज असलेले पोषक द्रव्य खताद्वारे उपलब्ध करून देऊ शकतो याचा नक्की आपल्या उत्पादनाला चांगला फायदा होईल शेतकऱ्यांनी विद्यार्थीना याबद्दल त्यांचे प्रश्न विचारलेव विद्यार्थिनी त्यांच्या प्रश्नाचे निराकरण केल.यावेळी गोपाल जायाभाये, सुदाम जाधव, ओमकार कोल्हे , नवनाथ बोंडे व इतर शेतकरी उपस्थित होते याकरिता कृषी दूत प्रताप देशमुख, विशाल खरबल, कृष्णा लाहोळे, ऋषिकेश लोखंडे,यांना कृषी महाविद्यालय रिसोड येथील विशेष तांत्रिक समन्वयक आर. एस. डवरे व कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम. अप्तुरकर यांच्या पूर्वनियोजित मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. तसेच विषय विशेषतज्ञ प्रा. एन . ए. खडसे आणि प्रा. एन. ए. कंकाळ यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यक्रम समन्वयक प्रा. डी. डी मसुडकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. वाय सरनाईक यांचे मार्गदर्शन लाभले.
