पातूर येथील दुलेखान युसूफ खान व खाँजा आसिफ अली यांचा सत्कार
पातुर प्रतिनिधी :- अकोला वाहतूक विभागाच्या वतीने गुड्स समॅरिटन या उपक्रमांतर्गत अकोल्यात अशा धाडसी पुरुषांचा सत्कार व त्यांच्या या प्रशंसनीय कार्याची दखल घेऊन रस्ते अपघातात अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या धाडसी जवानांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी व त्यांना घेऊन जाण्यासाठी मदतीचा प्रशंसिये कार्य हेतु पातूरचे दुले खान युसूफ खान आणि खाजा आसिफ अली यांना त्यांच्या सामाजिक व प्रशंसनीय कार्याबद्दल हेल्मेट व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यासोबतच माँ चंडिका आपत्कालीन बचाव पथकाचे रणजित घोगरे, वीरेंद्र देशमुख, विशाल उमाळे, योगेश बोदडे, प्रकाश फाटे, रवी यांचाही सन्मान करण्यात आला. घोगरे, श्री विनोद गावंडे व सार्थक पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांना प्रादेशिक परिवहन अधिकारी माननीय जयश्री दुतोंडे यांच्या हस्ते हेल्मेट देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमास प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्री.मनोज शेळके, न्यायालयीन विभागाचे श्री.अभिजीत गावंडे, लेखा विभागाचे श्री.किशोर देशमुख आदी उपस्थित होते.