खामखेड: दि.1 जुलै रोजी हरितक्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिर्ला अंधारे येथील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामखेड येथे कृषी दिन साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन केले व गावामध्ये वृक्ष दिंडी काढली आणि वृक्षारोपण केले. यावेळी गावातील कृषी सेवक गेडाम साहेब, सरपंच सौ.नंदा वि.काळे, उपसरपंच आकाश विटेवार, जि. प. शाळेच्या मुख्याध्यापिका देशमुख मॅडम, इतर शिक्षक व विद्यार्थी तसेच कृषी महाविद्यालय शिर्ला अंधारे येथील विद्यार्थी उदय घनबहादुर, एकांत गोंदोळे, संकेत कदम, साहिल नन्नावरे व गावातील इतर नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राम खर्डे सर कार्यक्रम अधिकारी प्रा.शिवकुमार राठोड सर कार्यक्रम समन्वयक व विषयतज्ञ श्रद्धा चव्हाण मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.