किड्स पॅराडाईज् येथे महिला संमेलन उत्साहात
पातूर : येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल च्या वतीने हळदी कुंकू निमित्त आयोजित महिला संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनात पार पडलेल्या विविध खेळांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत खेळांचा मनमुरात आनंद घेतला.
किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या कार्यकारी संचालिका उत्सव ज्योत्स्ना गाडगे यांच्या संकल्पनेतून हळदी कुंकू निमित्त महिला संमेलन ही संकल्पना साकरण्यात आली. यावेळी शाळेच्या मार्गदर्शक श्रीमती सरस्वतीआई गाडगे प्रामुख्याने उपस्थित होत्या. याप्रसंगी आई तुळजाभवानी,महालक्ष्मी,पातुरची रेणुका माता,पातुरची जगदंबा माता यांना स्मरण करीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी थोर समाज सुधारक जिजामाता, सावित्रीबाई फुले,अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई, आनंदीबाई जोशी, रमाबाई आंबेडकर,पी टी उषा, किरण बेदी, कल्पना चावला यांच्या कार्याला नमन करीत हे संमेलन त्यांना समर्पित करण्यात आले. हळदी कुंकू निमित्त उखाणे, संगीत खुर्ची, रिल्स टाईल्स, गायन, नृत्य असे महिलांमधील सुप्त गुणांना वाव देणारे खेळ पार पडले. महिला संमेलनाच्या यशस्वतेसाठी किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे, शिक्षिका नयना हाडके, प्रतीक्षा भारसाकळे, स्वाती वाळोकार, नितु ढोणे, प्रियंका चव्हाण, ऋतुजा राऊत, मोनाली तायडे, पूजा खंडारे, नेहा उपर्वट, शितल गुजर, प्रचाली थोराईत, नयना पाटोणे,योगिता शर्मा, रुपाली पोहरे, कल्पना वानेरे आदींनी परिश्रम घेतले.