खामखेड.ता.पातुर डॉ .पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय,शिर्ला अंधारे येथिल विद्यार्थ्यांनी बियाणे उगवन क्षमता संदर्भात पातुर तालुक्यातील खामखेड या गावात शेतक-यांना मार्गदर्शन केले शेतकरी शेतामध्ये बियाणे पेरतो आणि ५ते७ दिवसानंतर ते उगवलं की नाही ते तपासण्या करीता शेतात जातो. आणि काही वेळेस न उगवलेले बियाणे पाहून तो निराश होतो त्यामुळे त्यांना पुन्हा पेरणी करावी लागते, त्यात त्यांचा वेळ तर जातोच व त्यांचा अतिरिक्त पैसा ही जातो हे सगळे टाळण्याकरीता बियाणे उगवन क्षमता तपासणी किती आवश्यक आहे हे पटवून देण्यासाठी कृषी महाविद्यालय शिर्ला अंधारे येथिल विद्यार्थि उदय घनबहादुर, एकांत गोंदोळे, संकेत कदम, साहिल नन्नावरे यांनी सरळ व सोप्या पद्धतीने बियाणे उगवन क्षमता कसे पहायचे हे थोडक्यात समजावून सांगितले.यावेळी गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते.सदर मार्गदर्शना करिता महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.राम खर्डे सर, कार्यक्रम अधिकारी प्रा.शिवकुमार राठोड सर, कार्यक्रम समन्वयक प्रा.श्रद्धा चव्हाण मॅडम आणि विषयतज्ञ प्रा.श्री.रोहित कनोजे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
