राहेर प्रतिनिधी योगेश नागोलकर
सस्ती ग्रामपंचायत सरपंच द्वारकाबाई आनंदा मेसरे यांनी लबाडीने खोटे पुरावे सादर करून SDO कडून जात प्रमाणपत्र बनवले हे सिध्द झाले आहे . कोणताही व्यक्ती एकाच जातीचा किव्हा जमातीचा असते परंतु सस्ती सरपंच यांनी कोळी महादेव व आँध या दोन जातीचे प्रमाणपत्र देवून दोन वेळा निवडणूक मध्ये सरपंच झाल्या आहेत अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती अमरावती यांनी पडताळणी केली असता सर्व कागदपत्रांमध्ये हिंदू भोई या जातीचे मिळून आले. त्या मुळे सस्ती सरपंच यांचे जात प्रमाणपत्र जप्त करून महारष्ट्र अधिनियमन 2001 क्र .23 मधील कलम 10 व 11 नुसार गुन्हे दाखल करण्याचा आदेश अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती अमरावती यांनी तहसीलदार पातूर , जिल्हाधिकारी अकोला यांना दिला आहे ..