तेल्हारा :-
तेल्हारा नगरपरिषद अंतर्गत उभारण्यात आलेल्या आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर सभागृह पत्रकार भवनाचे लोकार्पण व अकोला जिल्हा पत्रकार मेळाव्याचे उद्घाटन आज बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता आमदार प्रकाश भारसाकळे यांचे अध्यक्षतेखाली ,अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते, स्वागताध्यक्ष तथा मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिर साहेब, अकोला जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस प्रमोद लाजूरकर ,उपाध्यक्ष रामदास वानखडे ,तेल्हारा न.प. माजी अध्यक्षा कान्होपात्रा फाटकर ,जयश्री पुंडकर, नगरपरिषद तेल्हाराचे विद्यमान मुख्याधिकारी सतीश गावंडे इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तेल्हारा हिवरखेड रोडवर सिद्धिविनायक प्रबोधन वसाहतीत वसलेल्या आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर सभागृह पत्रकार भवन लोकार्पण समारंभास व जिल्हा पत्रकार मेळाव्यास पत्रकार बंधू भगिनी तसेच निमंत्रितांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रसिद्ध पत्रकातून मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्नित अकोला जिल्हा पत्रकार संघ शाखा तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रल्हाद ठोकणे यांच्यासह सर्वश्री सुरेश शिंगणारे, सत्यशील सावरकर, अनंत अहेरकर, प्रा. कृष्ण फंदाट, रामाभाऊ फाटकर, सदानंद खारोडे, धर्मेश चौधरी, प्रशांत विखे ,प्रा. विद्याधर खुमकर, अनिल जोशी, अनिल अवताडे, निलेश जवकार ,बसवेश्वर मिटकरी, रवी शर्मा ,श्याम भोपळे, दत्तात्रय बिहाडे, सुरेश सिसोदिया, राहुल मिटकरी ,संदीप सोळंके, अमित काकड, विशाल नांदोकर, सुमित बिहाडे इत्यादी पत्रकारांनी केली आहे
