बदलापूर येथील चार वर्षाच्या मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी. जेणेकरून अशाप्रकारचे घाणेरडे कृत्य करण्यास भविष्यात कोणीही हिंमत करणार नाही. म्हणून उबाठा गट शिवसेना पातूर शहर व तालुक्याच्या वतीने मा. आमदार तथा जिल्हाप्रमुख नितीनजी देशमुख, अकोला जिल्हा प्रमुख श्री. गोपालजी दातकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख श्री.रवींद्र मूर्तडकर व शहर प्रमुख निरंजन बंड यांच्या नेतृत्वात

टी के व्ही चौकात आंदोलन करण्यात आले.राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात येऊन या प्रकरणात मा उज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी सह या घटनेची एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली व नंतर मा. तहसीलदार साहेब पातूर यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनच्यावेळी पातूर शहर व तालुक्यातील शेकडोच्या संख्येने शिवसैनिक हजर होते.