ड्रायव्हर विरोधी कायदा असल्याने सदर निर्णय मागे घेण्याची मागणी
पातूर : शासनाने हिट अँड रण हा नविन कायदा पारित केला असून या कायद्यामध्ये जर एखाद्या वाहनामुळे अपघात झाला आणि चालक पळून गेला तर त्यास दहा वर्षांची शिक्षा व सात लाख रुपये दंड अशी तरतूद केली गेली असून हा कायदा ड्रायव्हर विरोधी कायदा असल्याने चालक-मालक संघटना,पातूर तालुक्याच्या वतीने याचा विरोध करण्यात आला.
चालक मालक संघटना पातूर यांच्यावतीने तहसीलदार पातूर यांना निवेदन देण्यात आले की, केंद्र सरकारकडून नविन ड्रायव्हर विरोधी कायदा हिट अॅन्ड रन पारित करण्यात आला यामध्ये भारत न्याय संहिता २०२३ नुसार ७ लाख रू. दंड व १० वर्षांची शिक्षा अशी तरतूद करण्यात आली असून जर एखाद्यावेळेस वाहनाचा अपघात झाला तर चालकाने घटनास्थळावरून पळून नं जाता तिथेच थांबावे लागणार असल्याची अट असल्याने प्रसंगी तेथे उपस्थित गर्दीचा मार खाणे निश्चित असून यामध्ये चालकाच्या जीवितास देखील धोका होऊ शकतो.हा कायदा संपुर्ण चालक विरोधात असल्यामुळे सदर कायद्यामधील अटी ह्या शिथील करण्यात याव्यात किंवा हा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी पातूर तालुक्यातील खाजगी प्रवाशी,मालवाहक वाहन चालक व मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते