मा जिल्हाधिकारी साहेब अकोला त्यांच्या मार्गदर्शनाखाली पातुर नगरपरिषद अंतर्गत पातुर शहरांमध्ये घरोघरी पोहोचून सर्वेक्षण करिता टीम तयार करण्यात आलेली आहे सदर टीम चे काम सुरू झालेले आहे. तसेच शहरांमध्ये डेंगू चा आजार होऊ नये त्याकरिता शहरांमध्ये फवारणी सुद्धा नगरपालिका अंतर्गत सुरू करण्यात आलेले आहे.

नगर परिषद तर्फे आवाहन करण्यात आले की प्रत्येक घरामध्ये नगरपालिका अंतर्गत सुरू असलेल्या सर्वे बाबत मलेरिया,जलताप तपासणी करून घ्यावी तसेच बुधवारी नगरपालिकातील सर्व कर्मचारी अधिकारी, सफाई कर्मचारी तसेच सर्व पत्रकार सर्व माजी सैनिक यांचे साठी सुद्धा मलेरिया जलताप तपासणी साठी कॅम्प ठेवण्यात आले आहे कृपया आपण तपासणी साठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे

शहरांमध्ये नागरिकांचे आरोग्य सुरक्षित रहावे याकरिता पूर्ण नाल्या साफसफाई फवारणी याचे नियोजन करण्यात आले या सर्व ॲक्शन मोडवर पातुर नगरपरिषद चे प्रभारी मुख्य अधिकारी सय्यद ऐसानुद्दीन हे लक्ष देऊन आहेत जनतेने आपला परिसर स्वच्छ ठेवावा असे यावेळी आवाहन करण्यात आले आहे.