डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिरला अंधारे ता. पातुर जि. अकोला येथील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कायक्रमांअतंगत आलेगाव ता. पातुर येथील शेतकर्यांना मृदा स्वास्थ्य कार्ड योजनेअंतर्गत माहिती दिली.
यावेळी विद्यार्थ्यांनी कार्ड बद्दल माहिती दीली कशाप्रकारे काढले जाते, त्याकरिता कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते शेती चाचणी परिणाम केल्याचे फायदे, नुकसान, उत्पन्नाकरिता लागणारी खतांची शिफारसी, व कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते व मातीतील ई. सी, उपलब्ध सलफर, जिंक, लोहा इत्यादी चे आकलन माहिती पडते. सुमारे १४ करोड शेतकयांना अश्या प्रकारचे कार्ड वितरित करण्याचा सरकार चा मानस आहे जेनेकरून शेतकरी यांना योग्य ते पीक निवडणयास मदत होईल. ही भेट विद्यार्थी सागर शिरसाट, साहिल सावत, वैभव सुलताने, श्रेया शेगावकर, रोशनी सोनटक्के, गौरी ठोकळ यांनी दिली. यासाठी मार्गदर्शन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम खरडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. शिवकुमार राठोड सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. सागर भगत व विषय तज्ञ प्रा. ह. पोरे मॅम यांचे मार्गदर्शन लाभले.
