पातुरच्या किड्स पॅराडाईज मध्ये कार्यशाळा.
पातूर प्रतीनीधी :-शाळेत किंवा शिकवणीला जाताना तसेच आपल्या दैनंदिन जीवनात विद्यार्थ्यांनी आपली स्वतःची सुरक्षितता कशी घ्यावी, यासंदर्भातील धडे अकोला पोलीस देत आहेत. नुकतेच पातूर येथिल किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल येथे सक्षम या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या संकल्पनेतून “सक्षम” हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला आहे. विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षात्मक उपाय योजना या उपक्रमातर्गत पातूर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल येथे ही कार्यशाळा नुकतीच पार पडली.

गुड टच, बॅड टच तसेच इतर सतर्कता याबाबत विद्यार्थ्यांना जागृत करण्यात आले.अकोला पोलीस दलातर्फे पोलीस कर्मचारी गोपाल मुकुंदे यांनी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. यावेळी कार्यशाळेचे अध्यक्षस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे यांनी भूषविले.तर प्रमुख अतिथी म्हणून पातूर पोलीस स्टेशनच्या दामिनी मार्शल अनिता चौधरी,शाळेच्या कार्यकारी संचालिका सौ.ज्योत्स्ना गाडगे, महिला बाल कल्याण विभागाचे नितीन अहिर, पत्रकार अविनाश पोहरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना जनजागृती करणाऱ्या चित्रफीत दाखविण्यात आल्या.उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. संचालन पंकज अवचार यांनी तर आभार नितु ढोणे यांनी मानले.या उपक्रमासाठी मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नरेंद्र बोरकर, बजरंग भुजबटराव, अविनाश पाटील, हरिष सौंदळे, रविकिरण अवचार, पंकज अवचार, संकल्प व्यवहारे, नितु ढोणे, नयना हाडके, शानू धाडसे, प्रतीक्षा भारसाकळे, धनश्री माळी, भारती वालोकार, स्वाती वाळोकार, प्रियंका चव्हाण, पूजा खंडारे, प्रचाली थोराईत, माधुरी टाले, शीतल गुजर, ऋतुजा राऊत, रुपाली पोहरे, सुजाता पोहरे, शुभम पोहरे आदींनी परिश्रम घेतले.