सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात
पातुर तालुका प्रतिनिधी
पातुर येथे दरवर्षी प्रमाणे ऐतिहासिक रावण दहन आणि दसरा महोत्सव यावर्षी देखील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी भरलेला असणार आहे. 12 ऑक्टोंबर 2024 विजयादशमी यावर्षीचा महोत्सव सायंकाळी
साजरा करण्यात येईल
कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षणांमध्ये पातुर येथे ऐतिहासिक रावण दहन सोहळा होणार आहे,
सामाजिक कार्यकर्ते रितेश फुलारी यांच्या हस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमात पातूरचे युवा कार्यकर्ते
श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळेचे मंगेश गाडगे यांचा अध्यक्ष म्हणून सहभाग असणार आहे. प्रमुख पाहुणे अकोला जिल्ह्याचे खासदार अनुप धोत्रे, बाळापूर विधानसभेचे आमदार नितीन बापू देशमुख, माजी आमदार बळीराम भाऊ शिरसकर, शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते अनिल राऊत, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण भाऊ अंधारे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रकाश भाऊ तायडे, महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शंकरराव बोचरे, डीगंबर खुरसडे, शेषराव फुलारी बाबुराव गणेशे बळीराम बंड मधुकर गाडगे, राजाराम गाडगे, काशीराम उगले, बंडू पाटील आणि इतर मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमात विविध सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात आले येथील संगीततज्ञ प्रा. विलास राऊत यांच्या नेतृत्वाखाली भक्ती गीतांचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर
श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळेचे चित्त थरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात येईल. पातुर शहरातील आणि व्यायाम शाळेतील प्रसिद्ध खेळाडूंचाही सन्मान करण्यात येणार आहे.
त्यानंतर महाआरतीचे आयोजन जगदंबा देवी संस्थानच्या वतीने होणार आहे. तसेच, पातुर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या वतीने रामलीला नाटिकेचे सादरीकरण होईल. कार्यक्रमाच्या समारोपाला फटाक्यांची आतिषबाजी आणि रावण दहनाचा सोहळा होईल.या वेळीश्री सिदाजी महाराज व्यायाम शाळेचे वस्ताद चंदू वस्ताद वानखडे, भोजू पहेलवान बायस, राजूभाऊ उगले, शेषराव फुलारी, रितेश फुलारी, अमोल इंगळे पाटील, रवींद्र श्रीनाथ मेजर आणि आणि इतर मान्यवर उपस्थित होते.श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळेचे पदाधिकारी आणि दसरा उत्सव समिती यांनी पातुरच्या ग्रामस्थांना या ऐतिहासिक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून शोभा वाढवण्याचे आवाहन केले आहे