सुमित्राबाई अंधारे कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राम खर्डे यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व समजावून दिले.
हा दिवस साजरा करून, पृथ्वीवरील सर्व जीवनांना आधार देण्यात निसर्गाची महत्त्वपूर्ण भूमिका आपण मान्य करत असतो. स्वीडनमधील स्टॉकहोम येथे ५ जून १९७२ रोजी संयुक्त राष्ट्रांची मानवी पर्यावरण विषयक परिषद झाली. या दिवसाचे औचित्य साधून १९७३ मध्ये जगाने आपला पहिला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी याच दिवशी हा विशेष दिवस साजरा केला जातो. दरवर्षी, जागतिक पर्यावरण दिन एक विशिष्ट थीम सह साजरा केला जातो – हवामान बदलापासून ग्लोबल वॉर्मिंगपासून ते जंगलतोडीपर्यंत तात्कालिक समस्यांना लक्ष्य करून. यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाची थीम आहे- जमीन पुनर्वसन, वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण.
पर्यावरण जनजागृती करणे हेतू वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण करण्यात आले. कृषि महाविद्यालय शिरला परिसरात स्वच्छता अभियान राबवून पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताहला सुरुवात झाली. ‘एक माणूस एक झाड’ याप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रयत्न करूया असा संदेश राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवका मार्फत या वेळी देण्यात आला. यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . राम खरडे , प्रा.सौरभ वर्मा, प्रा. मोहन सुरुशे व प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.रोहित कनोजे ( अनुवंशशास्त्र आणि वनस्पती प्रजनन ), प्रा. श्रद्धा चौहाण ( विस्तार शिक्षण विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकामार्फत तसेच संपूर्ण कर्मचारी वृंद सुमित्राबाई अंधारे कृषि महाविद्यालय शिरला यांच्या सहकार्याने पर्यावरण जनजागृती करण्यात आली आहे.
