अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न अकोला जिल्हा पत्रकार संघ पातुर तालुका पत्रकार संघाची वार्षिक सभा नुकतीच वाडेगाव येथे संपन्न झाली.या सभेचे अध्यक्ष पातुर तालुका अध्यक्ष सतीश सरोदे हे होते.तर जिल्हा कार्यकारणी सदस्य उमेश देशमुख,प्रदीप काळपांडे,माजी ता.अध्यक्ष अब्दुल कुद्दूस शेख,अब्दुल जफर,किरण कुमार निमकंडे, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.यावेळी वार्षिक सभेमध्ये पत्रकार संघाच्या पुढील वाटचाली बाबत चर्चा करण्यात आली.या सोबतच नवीन सदस्य नोंदणी बाबत चर्चा करून आगामी काळात सदस्य नोंदणी बाबत जबाबदारी या सभेमध्ये सोपविण्याबाबत चर्चा करण्यात आली.

तसेच अकोट येथील पत्रकार रामदास काळे यांचे आई स्व. गयाबाई काळे यांचे सात जानेवारी रोजी निधन झाले त्या निमित्त त्यांना यावेळी पत्रकार संघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश सरोदे,उमेश देशमुख,प्रदीप काळपांडे, किरण निमकडे,अब्दुल जफर,अब्दुल कुदुस संगीता इंगळे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी माजी तालुकाध्यक्ष मोहन जोशी,तालुका सचिव संगीता इंगळे,निखिल इंगळे,नासिर शेख,साजिद सर,गोपाल राठोड,प्रमोद काढोणे,राहुल देशमुख,नातीक शेख,श्रीकृष्ण लाखाडे,योगेश नागोलकार,अमोल देवकते, सचिन ढोणे,श्रीकृष्ण शेगोकार,पंजाब इंगळे,भावेश गिरोळकर यांच्या सह अनेक पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन शेख नासिर यांनी केले.