मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत मदर इंडिया कॉन्व्हेन्ट येथे आज आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. वर्ग एक ते सात च्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. पातुर येथील डॉ वैष्णवी मानकर धोत्रे व डॉ निलेश धोत्रे यांनी या शिबिरामध्ये सेवा दिली.
Andhra मुलांच्या पोषण आहाराबद्दल त्यांनी विशेष मार्गदर्शन केले.संस्थेच्या सचिव सौ स्नेह प्रभादेवी गहीलोत व माजी प्राचार्य विजयसिंहजी गहीलोत यांनी या उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी मुख्याध्यापक महेंद्र खंडारे, अर्जुनसिंह गहीलोत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
