जनसेवक सचिन ढोणे व भाजपा पातुर यांचा स्तुत्य उपक्रम
पातूर : शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ घेण्यास लाभार्थ्यांना सुलभ व्हावा या हेतूने सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा जनसेवक सचिन समाधान ढोणे व भारतीय जनता पार्टी पातुर यांच्या वतीने नगरपरिषद मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना 2.0(शहरी ) च्या लाभासाठी पातुर शहराच्या हद्दीतील नागरिकांना मोफत ऑनलाईन अर्ज भरून देण्याची सुविधा सचिन समाधान ढोणे यांच्या जनसंपर्क कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शिवाजीनगर पातुरला दिनांक 16 जानेवारी 2025 पासून सकाळी 10 ते 5 या वेळात करून देण्यात आली आहे.
या छोटेखानी कार्यक्रमाचे उद्घाटन गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पातुर तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासनाने नागरिकांच्य हिताच्या विविध योजना कार्यान्वित केल्या परंतु त्या योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो व त्यासाठी वेळ आणि पैसा द्यावा लागतो तो वाचवण्यासाठी लाभार्थ्यांनी वरील ठिकाणी सकाळी दहा ते पाच या वेळेत येऊन सदर सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन जनसेवक सचिन ढोणे व भारतीय जनता पार्टी शहर यांच्या वतीने करण्यात आले आहे.