पातुर प्रतिनिधी
प्रत्येक भारतीय भारतीयांसाठी अस्मितेचा प्रश्न असलेला भारत देश आज भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन ठीक ठिकाणी उत्साहात साजरा होत असतांना पातुर तहसील कार्यालय येथे 76 वा गणतंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी

पातुर तालुक्यातील उल्लेखनीय कामगिरी करणारे माजी सैनिक, शासकीय कर्मचारी,विद्यार्थी,समाजसेव, स्वतंत्र सैनिक,यांना सन्मानित करण्यात आले.

पातुर तहसील येथे ध्वजारोहण तहसीलदार डॉक्टर राहुल वानखडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पातुर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी व पातुर होमगार्ड्स, एनसीसी कॅडेट्स, यांच्याकडुन राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी पातुर शहरातील गणमान्य नागरिक समाजसेवक,पत्रकार व शहरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.