पातुर अकोला राष्ट्रीय महामार्गाचे निरमाणीकरणाचे काम चालू असून याच्यामध्ये मांटो कार्लो कंपनीच्या निष्काळजीपणामुळे अनेक जणांची जीव गेले आहेत काल रात्री अकोला येथील युवक पातुर वरून अकोला जात असताना एमएसईबी सब स्टेशन जवळ वळण महामार्गाला दिशा फलक नसल्याने युवक हा सरळ चुकीचा मार्गाने गेल्याने अपघात होऊन घटनास्थळी ठार झाला.
अकोला येथील युवक सुरज माणिकराव अहिर वय 24 वर्ष रा. कोलखेड मोटार सायकलने अकोला हा रात्रीला पातूर वरून अकोला कडे जात असताना सब स्टेशन जवळ त्याचा मोठा अपघात होऊन रात्रभर जखमी अवस्थेत पडून राहिला हा अपघात रात्रीला कोणाला न दिसल्याने युवक उपचार ऐवजी मरण पावला. या घटनेचे पातूर परिसरात सर्वत्र हळवळ व्यक्त होत आहे.आज सकाळी पातुर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनेच्या पंचनामा केला व पुढील तपास ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय तडसे करीत आहेत