पातुर शहरात सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे या पावसामुळे सखोल भागात शहरात पाणीच पाणी साचले असून नगर परिषदेचा भोंगळ कारभार हा उघड झाले आहे नगरपरिषद ने मान्सूनपूर्व कोणतीही साफसफाई न केल्यामुळे शहरात मोठ्या वस्तीमध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे

भोईपुरा व आठवडी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थितीप्रमाणे पाणी वाहत होते तर आठवडी बाजार ,पोलीस स्टेशन परिसर ,गहिलोत नगर ,सेमी प्लॉट, मिलिंद नगर ,गजानन नगर, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून नाल्यांना पूर आला आहे सर्वत्र शहरांमध्ये घाणच घाण पसरली आहे. नगरपालिका व महावितरण याची पोलखोल या मुसळधार पावसाने उघड केली आहे पातुर शहर सर्वत्र अंधारात असून या ठिकाणी कोणत्या प्रकारचे नियोजन नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे पातुर शहर व शिरला ग्रामपंचायत परिसरातील अनेक भागातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सायंकाळच्या धुवाधार पावसाने शहरात दनादन केली असून सर्वत्र घाणच घाण पसरल्याचे चित्र निर्माण झाले आहे