राष्ट्रीय टेनिस बॉल फेडरेशन व टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन संलग्न पातुर टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या अधिपत्याखाली शास्त्री स्टेडियम नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत या खेळाडूंची निवड 31 ते 2 जून दरम्यान शिमला कांगडा येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी झाली आहे पातुर च्या खेळाडूंना पहिल्यांदाच हा बहुमान मिळत आहे त्यामध्ये…
अंडर १७ 1) आर्यन पवार, 2) शिवम यादव
अंडर १४ 1)अमित तायडे
या खेळाडूंची निवड झाली आहे त्यांना अर्जुनसिंह गहिलोत सर यांचे प्रशिक्षण तर मुख्य प्रशिक्षक शिवाजीराव चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले आहे टेनिस बॉल क्रिकेट हा खेळ पाच टक्के खेळाडू आरक्षण मध्ये असल्यामुळे पातूरच्या खेळाडूंचा उत्साह उत्साह दुगणीत झाला आहे.
वरील सर्व खेळाडूंची अभिनंदन तुळसाबाई कावल विद्यालय पातूरचे प्राचार्य श्री अंशुमानसिंह गहिलोत यांनी केले आहे.
