डॉ.पं. दे. कृ. वि. अकोला अंतर्गत श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिरला अंधारे येथील विद्यार्थ्यांनी कृषी कार्यअनुभव कार्यक्रम अंतर्गत नादखेळ येथील शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक बद्दल माहिती दिली. तसेच बीज प्रक्रिया करण्याची योग्य पद्धत त्यांना प्रात्यक्षिकासह समजावून सांगितली व पेरणी करण्यापूर्वी योग्य पद्धतीने बीज प्रक्रिया केल्यास त्याचे फायदे सांगितले. शेतकऱ्यांच्या शंका व समस्यांचे उपस्थित विद्यार्थ्यांनी निराकरण केले. यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थीनी कल्याणी धोटे ,शरयू अकोलकर, प्रेरणा ढोरे, नेहा अंबुसकर साक्षी बूराण ,नारायणी चौधरी, यांनी मार्गदर्शन केले. तसेच सरपंच हरिदास माने ,शेतकरी विजय वानखडे ,बाबुराव माने ,प्रकाश बोतरकर ,दिगंबर जोगळेकर, गणेश इंगळे इत्यादी शेतकरी उपस्थित होते. या उपक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम खरडे, कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक शिवकुमार राठोड प्राध्यापीका श्रद्धा चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
