आज दिनांक चार जुलै हा बोडखा गावाचे सरपंच विकास सुभाष वानखडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवन चरित्रावरचा हा लेख ! पातुर शहरापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेले पहाडाच्या कुशीत बोडखा गाव असून या ठिकाणी सर्व मागासवर्गीय समुदाय मोठ्या सुखाने नांदतो. आज पर्यंतच्या इतिहासामध्ये या गावचा सरपंच हा वयस्कर होता परंतु गेल्या निवडणुकीत गावातील तरुण मंडळींनी तरुण सरपंच असला पाहिजे या विचाराने सर्व गावकऱ्या मिळून विकास वानखडे याला प्रचंड मताने निवडून दिले. विकास हा कबड्डी खेळातील प्राविण्य प्राप्त विद्यार्थी असून त्याला राजकारणाचा थोडाही गंध नव्हता परंतु गावाचा विकास व्हावा या हेतूने गावातील मित्रमंडळींनी विकासला निवडणुकीत उभे केले व विजय प्राप्त करून दिले सरपंच पदी नियुक्त होताच विकासने गावातील अनेक समस्या ह्या मार्गी लावल्या अनेक योजना राबविण्यात त्याने पुढाकार घेतला एक वर्ष गावातील समस्याच्या विचारविनिमय करून येणाऱ्या काळात प्रचंड प्रमाणात गावाचा विकास करण्याचा उद्दिष्ट ठेवून कामाला गती दिली परंतु या कामाला काही विरोधकांना विकासचा हा विजय सहन न झाल्याने अडकाठी आणण्याचा प्रयत्न केला परंतु विकास यांनी या विरोधाला थोडेही लक्ष न देता आपले कामकाज चालूच ठेवले. गावातील अनेक युवकांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला बोडखा गावातील सर्वात कमी वयाचा व मागासवर्गीय असा पहिला मान पटकावण्याचा सरपंच विकास सुभाषराव वानखडे यास मिळाला तो बोडखा, चिंचखेड या गावातील युवकाचे प्रेरणास्थान आहे आज त्यांचा वाढदिवस असताना त्यांनी कुठेही गावात बॅनरबाजी न करता गावात अपंग लोकांना मदत करून वृक्षारोपणाचे एक पुण्याचं कार्य केले आहे. त्यांना या वाढदिवसाला रोखठोक न्यूज च्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
