*तज्ञांनी केले प्रशिक्षण वर्गाला मार्गदर्शन
- तालुक्यातील गोपालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
पातूर : महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग पातुर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय गो आधारित शेती प्रशिक्षण वर्ग सोमवार दिनांक 20 जानेवारी रोजी संगम मंगल कार्यालय पातुर येथे सकाळी दहा ते चार या वेळात आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षण वर्गाला जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त अकोलाचे डॉ. जे.एम. बुकतरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद अकोला चे डॉ. एन. ए. अरबट, पातुर तहसीलचे तहसीलदार राहुल वानखडे, पंचायत समिती पातुरच्या गटविकास अधिकारी सौ. एन.के.इंगळे, तालुका कृषी अधिकारी पातूरचे संजय अटक, यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रशिक्षण वर्गाला तज्ञ मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य उद्धव नेरकर उपस्थित होते.
या प्रशिक्षण वर्गाला दिवाकर नेरकर यांनी भारतीय गोवंश जन जीवनाचा आधार व गो आधारित शेती त्याचबरोबर शेतीमधील शेण गोमुत्राचे महत्त्व व गोशाळा स्वावलंबन याविषयी व्याख्यान केले तर स्ना. प. प. स पशुवैद्यकीय महाविद्यालय महाविद्यालय अकोला चे प्राध्यापक डॉक्टर कोडापे यांनी गाईच्या गोठ्याची व आहाराचे व्यवस्थापन याविषयी व्याख्यान देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला पातुर तालुक्यातील गोपालक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन व नियोजनाची जबाबदारी पशुसंवर्धन विकास अधिकारी (विस्तार )पंचायत समिती पातूरचे डॉ. यु. एम. शेगोकार व पंचायत समिती पातूरचे पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.प्रशांत अस्वार यांनी पार पाडली. सदर गो आधारित शेती प्रशिक्षण वर्गात संबंधित मार्गदर्शकांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले