पातुर येथील समीर अहमद ठरला सुवर्णपदकाचा मानकरी; जल्लोषात स्वागत
पातुर तालुका प्रतिनिधी
पातुर येथील युवा बॉक्सिंग पटू समीर अहमद ने आपल्या विशेष खेळाची शैली दाखवत महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. त्याच्या यशामुळे तो राष्ट्रीय स्तरावर लढण्यास पात्र ठरला आहे, आणि यामुळे पातुर व अकोल्याच्या क्षेत्रात त्याची मदार झाली आहे.
बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत रिव्ह्यू कमिटी यांच्या वतीने शेगाव येथील सरस्वती कॉलेजमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. समीर अहमदने या स्पर्धेत उत्कृष्ट परफॉर्मन्स देऊन सुवर्णपदकाची कमाई केली, ज्यामुळे त्याला राष्ट्रीय स्तरावर स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.
२१ डिसेंबर २०२४ रोजी या स्पर्धेचा समारोप झाला. समीर अहमद मूळ पातुरचा असल्यामुळे त्याचे स्वागत विशेष जल्लोषात करण्यात आले. पातुरच्या जुने बस स्थानकावर रात्री आठ वाजता समीर अहमदच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थित लोकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली आणि त्याचा उत्साहात स्वागत केले.
यावेळी पातुरमध्ये विविध क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. त्यामध्ये कुदुस पहेलवान, मोहम्मद मेहताब पैलवान, वरीष्ठ क्रीडा शिक्षक श्री. विठ्ठल लोथे सर, राज्य क्रीडा मार्गदर्शक अक्षय टेंभुर्णीकर, हाफिज भाई, मुजाहिद भाई, मेहमूद पैलवान, तनवीर पैलवान, परवेज भाई, इरफान पैलवान, अलीम पैलवान, अहमद भाई, राहील भाई, अब्दुल कादर, मोहम्मद एजाज, पत्रकार प्रदीप काळपांडे, देवानंद भाऊ गहिले सामाजिक कार्यकर्ते काझी वकारोद्दीन यांचा समावेश होता.
त्यांनी समीर अहमदचे कौतुक केले आणि त्याचे राष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या. समीरने पातुरचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावल्यामुळे त्याच्यावर सर्वत्र अभिमान व्यक्त केला जात आहे.
समीर अहमदच्या यशामुळे पातुरच्या क्रीडा क्षेत्रात एक नवा विश्वास निर्माण झाला आहे आणि यामुळे भविष्यात आणखी युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. समीर अहमद यांनी त्यांचे यशाचे श्रेय यांचे वडील अब्दुल गणीभाई , डॉ. सतीश चंद्र भट क्रीडा अधिकारी व शासकीय कोच अक्षय टेंभुर्णीकर यांना दिले आहे