पातुर प्रतिनिधी :- पातुर येथील प्रसिद्ध तप्पे हनुमान व्यायामशाळा कावड यात्रा ही परतीच्या मार्गावर असतांना रात्रीला दहाच्या सुमारास कावड यात्रेमध्ये मालवाहू टिप्परने धडक दिल्याने मोठा अपघात होऊन घटनास्थळी दोन जण ठार व आठ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

सविस्तर माहिती अशी आहे की पातुर येथील माजी सभापती अनंता बगाडे यांची सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.तपे हनुमान कावड यात्रा हे तीर्थक्षेत्र काशी येथील जलतीर्थ घेऊन परतीच्या मार्गावर असतांना शिवनी महामार्गा वर कावळ यात्रा शिस्त पद्धतीने चालत असतांना अचानक मागून टिप्पर क्र. mp g 34 6540 टिप्परने कावड यात्रेमधील ट्रॅक्टरला

धडक दिल्याने ट्रॅक्टर मध्ये झोपलेले कावळधारी यांना जबर धडक बसल्याने पातुर गुरुवार पेठ येथील रहिवासी बंडू बंड व रेणुका माता टेकडी परिसर येथील अवि पोहरे हे घटनास्थळीस ठार तर आठ जण जखमी झाली आहे घटनास्थळी मध्य प्रदेश येथील समाजसेवक शिवभक्तांनी जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.या दुःखद घटनेची माहिती पातुर शहरात कळताच संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे.