अकोला पोलीस दलाकडून मा.श्री बच्चन सिंह पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हा पोलीरा घटकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचा गोळीबार सराव २५/११/२०२४ पासुन सकाळी ०६:०० वाजता फायर बट पातुर येथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा वार्षिक गोळीबार सरावाला सुरवात करण्यात आली आहे.
दिनांक २५/११/२०२४ रोजी सकाळी ०६:०० वाजता सर्व पोलीस अधिकारी यांचा गोळीबार सराव घेण्यात आला. त्यामध्ये स्वतः पोलीस अधीक्षक यांनी सराव केला सोबतच अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांचे सह त्यामध्ये एकूण ७५ अधिकारी यांचा सहभाग होता. दिनांक २६/११/२०२४ रोजी सर्व जिल्ह्यातील पोलीस स्टेशन व शाखा मधील एकूण ४३८ पोलीस अमलदार यांनी सराव केला ३०/११/२०२४ रोजी पर्यंत पोलीस अंमलदार यांचा गोळीबार सराव होणार आहे.
पातुर फायर बट येथे राखीव पोलीस निरीक्षक श्री गणेश जुमनाके यांचे नेतृत्वात वार्षिक गोळीबार सराव पार पडत आहे. असे अकोला जिल्हा पोलीस सूत्राकडून कळविण्यात आले आहे
