पातूर – तालुक्यात मंगळवारी वादळी हवेसह गारपीट झाली होती बुधवारी दुसर्या दिवशीही पातूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वादळी हवेसह पाऊस पडल्याने अनेक गावातील झाडे उन्मळुन पडली असुन वादळी हवेचा जोर जास्त असल्याने अनेक गावातील घरावरील टिनपत्रे उडुन गेली वादळी हवे मुळे पुन्हा एकदा शेतकर्याच्या कांदा सह निबु. आंबा या सह फळबागेचे मोठे नुकसान झाले आहे देवुळगांवात विज पडल्याने गोठ्यातील कुटाराच्या गंजीला आग लागल्याची माहीती आहे
पातूर तालुक्यात बुधवारी सांयकाळी देउळगांव. बाभुळगांव. आलेगांव. विवरा अंबाशी मळसुर, सायवणी, पास्टुल, आस्टुल, खानापुर. खामखेड भागात मोठ्या प्रमाणात वादळी हवेसह पाऊस पडला या मुळे शेतकरी पुन्हा एकदा अस्मानी संकटात सापडला आहे वादळी हवे मुळे तालुक्यातील अनेक गावातील झाले जमीनीवर उन्मळुन पडली होती या मुळे बाभुळगांव आलेगांव रस्ता काही वेळ बंद सुध्दा पडला होता तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे शेतकर्याचे फळबाग सह कांदा पिकाचे नुकसान झाले असुन हाता तोडाशी आलेला घास पुन्हा एका निसर्गाच्या लहरी पणामुळे शेतकर्याच्या हातातुन जात आहे तालुक्यात वादळी हवेमुळे अनेक घरावरील टिनपत्रे उडुन गेली असुन शासन स्तरावर पंचनामे करण्यात येणार असल्याची माहीती आहे तालुक्यातील देऊळगांव मध्ये मोहन सुर्यभान उपर्वट यांच्या घरा समोर विज पडल्याने त्याचे कुटार जळाले आहे तर मनोहर उपर्वट यांच्या घरावरील टिन पत्रे उडाली आहे यासह तालुक्यात अनेक ठिकाणी टिनपत्रे उडल्याने अनेकाचे संसार उघडल्यावर आले आहे तालुक्यात वादळी हहवा व अवकाळी मुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे

{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}