पातुर तालुक्यातील बाबुळगाव आलेगाव रोडवर जामरून फाटा येथे दुचाकी च्या अपघातामध्ये एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना २० फेब्रुवारी सकाळी अकरा वाजता घडली आहे. घटनेची माहिती मिळतात पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी तातडीने पोहोचले.

जखमींना ताबडतोब उपचारा करिता अकोला येथे हलविण्यात आले. घटनेची हकीगत अशी आहे की पातुर येथील समता नगर येथे रहिवासी असलेले सागर मुकिंदा गुडदे व विजय ताजने हे मोटरसायकल क्रमांक Mh 30 AQ 70 53 या वाहनाने आलेगाव येथे जात असताना

रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडाला जबर धडक दिल्याने दोन्ही युवक गंभीर जखमी झाले या दोघांना उपचाराकरिता अकोला येथे नेत असताना विजय ताजनेचा रस्त्यामध्येच मृत्यू झाला तर सागर गुडदेची तब्येत गंभीर असून त्याच्यावर अकोला येथील रुग्णालयात उपचार चालू आहे . घटनास्थळी ठाणेदार किशोर शेळके व हेड कॉन्स्टेबल घोंगे, भारस्कर यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास पातुर पोलीस करीत आहेत

