पातुर तालुक्यातील भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये वीर जवान शहीद आनंदा काळपांडे यांना 19 71 मध्ये वीरगती प्राप्त झाली होती या पातुर मातीतील वीर जवान शहीद आनंद काळपांडे यांचा 5 डिसेंबर रोजी स्मृतिदिन आनंद काळपांडे चौकात एजूवला पब्लिक स्कूल व सक्षम प्रतिष्ठान, माजी सैनिक संघटनेच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी वीर पत्नी श्रीमती विमलाबाई आनंदा काळपांडे तुकारामजी निलखन अध्यक्ष माजी सैनिक संघटना, महादेवराव परमाळे, देविदास निमकंडे, अंबादास टप्पे ,वसंता बंड, अशोक कोथळकर, प्रमोद खंडारे, दीपक गाडगे, दिगंबर गाडगे, रवी घाडगे, संजय बगाडे सर्व माजी सैनिकासह दिलीप सिंह ठाकुर, परसरामजी उंबरकर माजी नगर उपाध्यक्ष, वर्षाताई बगाडे माजी नगरपरिषद उपाध्यक्ष, कुमारी गौरी पिंजरकर नगरपरिषद कार्यालय अधीक्षक, रुस्तम गवइ माझी होमगार्ड समादेशक, निरंजन बंड शिवसेना शहर प्रमुख, विद्याताई गाडगे मुख्यध्यापिका उज्वला पब्लिक स्कूल , जनार्दन ढोकणे माजी मुख्याध्यापक, डॉक्टर स्वाती ढोकणे, डॉक्टर स्वप्नील ढोकणे, प्राध्यापक मीराताई ढोकणे रमेश काळपांडे, विलास राऊत, प्रकाश निमकंडे, दयाराम काळपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एज्युला पब्लिक स्कूलच्या वतीने यावेळी मानवंदना देऊन त्या ठिकाणी सर्व मान्यवरांनी श्रद्धांजली समर्पित केली. स्मृतिदिनी एजुवला पब्लिक स्कूलच्या वतीने शहरातून आनंदा काळपांडे यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमाला छत्रपती गाडगे, अविनाश काळपांडे, महेश काळपांडे, सुरेश काळपांडे, दिनेश काळपांडे, प्रभुदास बोंबटकार ,दिगंबर बंड, कृष्णा बोंबटकार, सचिन इंगळे, राऊत, प्रशांत बंड, प्रमोद उगले, विश्वजीत काळपांडे, अनिल गाडगे, मुरलीधर काळपांडे, पार्वताबाई काळपांडे, कमल काळपांडे, कुसुम काळपांडे, रत्नाबाई काळपांडे, पंचफुलाबाई काळपांडे यांच्या शहरातील नागरिक उपस्थित होते सूत्रसंचालन प्रदीप काळपांडे यांनी केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली
——————————————————–+——-
शहीद आनंदा काळपांडे यांच्या स्मृतिदिनाला पातुर पोलिसांना विसर उपस्थितत्या मध्ये नाराजीचा सूर उमटला
——–_———————————————————