टी.के.व्ही.चौक ते खानापूर आगीखेड रस्त्यांचा मुहूर्त निघाला…..
आमदार नितीन देशमुख यांच्या पुढाकाराने 64 लक्ष रुपयाचा निधी मंजूर….
पातुर प्रतिनिधी :- तुळसाबाई कावल विद्यालय चौक ते खानापूर आगीखेड रस्ता हा पूर्णतः उखडून गेला असून त्यावर मोठमोठे खड्डे तयार झाले होते.त्या खड्ड्यामुळे त्यामध्ये पावसाचे पाणी जमा होत होते.त्यामुळे संपूर्ण रस्ता हा टी के व्ही चौक ते आगीखेड पर्यंत चिखलमय झाला होता.

त्यामुळे या रस्त्यावर शाळकरी मुले तसेच वयोवृद्ध म्हातारे यांना पायी चालणे सुद्धा कठीण झाले होते.त्यातच पातुर नगर परिषद ची पाणीपुरवठा विभागाची पाईपलाईन दर दोन दिवसांनी फुटत असल्यामुळे आणि फुटलेल्या पाईपचे पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे समस्या आणखीन गंभीर झाली होती त्यामुळे गेल्या सात ते आठ वर्षापासून सदर रस्त्याची कोणत्याही प्रकारे दुरुस्ती करण्यात आलेली नव्हती म्हणून संपूर्ण रस्ता हा चिखलमय झाला होता त्यातच या रोडवरील व्यापाऱ्यांनी तसेच या रोड संदर्भात जोडल्या गेलेल्या आगीखेड, खामखेड,खानापूर,आस्टूल,पास्टूल,कोठारी,राजनखेड, पांगराबंदी,चेलका,निंबी,पार्डी,या गावातील अनेक नागरिकांनी व काही सरपंचांनी या रस्त्या संदर्भात अनेक वेळा संबंधित विभागाला सदर रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यासंदर्भात निवेदन सुद्धा दिले होते.व अनेक वेळा वृत्तपत्रात तशा प्रकारच्या बातम्या सुद्धा प्रसिद्ध झाल्या होत्या परंतु त्याचा कुठलाही फायदा झालेला नव्हता अखेर या परिसरातील नागरिकांनी दिनांक 14 जुलै 2025 रोजी रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग तात्काळ जागृत होऊन दिनांक 10 जुलै रोजी उपकार्यकारी अभियंता राजेश राठोड व शाखा अभियंता हेमंत राठोड यांनी संबंधित रोडची प्रत्यक्ष पाहणी करून रोड तात्काळ दुरुस्त करण्याचे आश्वासन व्यापारी आणि उपस्थित नागरिकांना दिले होते.परंतु ते आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अपूर्णच राहिले.. त्या रोडवर थातूरमातूर माती मिश्रित मुरूम टाकण्यात आला होता.त्यामुळे या परिसरातील बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य देवलाल डाखोरे तसेच गणेश घुगे,यांनी पुढाकार घेऊन कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील शाखा अभियंता हेमंत राठोड व या परिसरातील नागरिक यांना सोबत घेऊन संबंधित रस्त्याची 12 जुलै 2025 रोजी तात्काळ प्रत्यक्ष पाहणी केली व सार्वजनिक बांधकाम विभागाला सदर रस्ता हा सिमेंट रोड व दोन्ही साईडला नाल्या बांधून देण्याचे आदेश दिले.त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित रोडचा प्रस्ताव तयार करून या रोड साठी 64 लक्ष 50 हजार रुपयाचा निधी तात्काळ मंजूर करून दिला. त्याबद्दल या परिसरातील नागरिकांनी आमदार नितीन देशमुख यांचे विशेष आभार व्यक्त केले. सदर सिमेंट रोड व दोन्ही साईडला नाली बांधकामाचे लवकरात लवकर सुरुवात होणार असल्याचे आमदार नितीन देशमुख तसेच संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.त्यामुळे जनतेमध्ये असलेली नाराजी लवकरच दूर होणार असून या परिसरातील नागरिकांमध्ये आनंद निर्माण झाला.