पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या माझोड या गावांमध्ये कतली करता गोवंश घेऊन जाणारा वाहन पातुर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. माझोड या गावांमध्ये पातुर येथील आरोपी सय्यद अनिस सय्यद रहीम रा. जमादार प्लॉट पातुर हा एक गोरा किंमत 12000 रुपये हा कतलीकरिता अशोक लेलँड mh 30 Bd 4919 या वाहनांमधून नेत असताना पातुर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सदर आरोपी व गोरा ताब्यात घेतला व आरोपी विरुद्ध ए एसआय अरविंद पवार यांनी तक्रार दिली. आरोपी यांच्याविरुद्ध गुन्हा 5 अ 9 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 प्रमाणे गुन्हा दाखल केला वरील कारवाई ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली असून सदर ताब्यात घेतलेला गोरा हा तुळजापूर येथील वनराई गोरक्षन यांच्या ताब्यात देण्यात आला पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत
