पत्रकार संघटनेसह,विविध संघटना तर्फे सत्कार

पातूर प्रतिनिधी:- (संगीता इंगळे) जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले पातुर तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील सावरगाव येथील गजानन पायघन यांनी गेल्या दहा वर्षापासून उत्तरीय तपासणीसाठी मोफत मृतदेह नेण्याचे कार्य सुरू आहे. सावरगावसह परिसरातील आकस्मिक मृत्यूची घटना घडल्यास पोलिसांच्या एका फोनवर अवेळी उपलब्धता दाखवून शेकडो कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह त्यांनी स्वतः आपल्या हाताने उचलून गाडीत टाकले आहे. जिथं रक्ताची व नात्याची माणसं हतबल होतात तिथून गजानन पायघन हे कुजलेल्या मृतदेहाची विटंबना होऊ नये व त्याचा शेवट चांगला व्हावा या उद्देशाने आपल्या कार्याची सुरुवात करतात.जिवंत माणूस हा माणसाच्या स्वार्थापोटी कामी येतो परंतु मेलेला माणूस हा कधी जिवंत माणसाच्या कामी येऊ शकत नाही.परंतु गजानन पायघन यांनी मेलेल्या माणसांच्या कामी येऊन सामाजिक बांधिलकी जपत समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अनेकानी त्यांचे सत्कार केले. कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाची दुर्गंधी पसरत असताना गजानन पायघन त्यांना उत्तरीय तपासणीसाठी नेऊन पोलिसांना मोलाचे सहकार्य करत आहे.त्यामुळे पायघन हे कुजलेल्या मृतदेहासाठी देवदूत ठरत असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.याच साठी केला अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा तुकाराम महाराजांच्या अभंगातील शब्दाप्रमाणे
प्रत्येक माणूस हा जन्माला आल्यानंतर त्याचं मरण चांगलं व्हावं यासाठी त्यांना समाजाकडून उपदेश दिले जातात, परंतु माणूस मेल्यानंतर रक्ताचीही नाते माणसाला हात लावायला धाडस दाखवत नाही.जिवंतपणे सगळेच एकमेकांचे कामी येतात परंतु मेल्यानंतरही माणूस कामी येऊन एक माणूस पण जपलं पाहिजे.गजानन पायघन सामाजिक कार्यकर्ता सावरगाव