डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत शिर्ला अंधारे येथील श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थी वैभव भोयर, दिव्या भुडके, कृष्णा बिलबिले, धनश्री बुलबुले , आदेश चांदूरकर यांनी भांडारज येथील शेतकऱ्यांना कृषी संबंधित असलेल्या ई-पीक पाहणीबाबत माहिती दिली , या वेळी निलेश भगत, राष्ट्रपाल इंगळे , निलेश इंगळे , सुखदेव इंगळे , इत्यादी शेतकऱ्यांची प्रमुख्याने उपस्थिती होती ई-पीक पाहणी ॲपमुळे शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची अचूक नोंद केली जाते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.पी. खरडे, कार्यक्रम समन्वय प्रा. शैलेश दवने कार्यक्रम अधिकारी प्रा. सा. भगत विषयतज्ज्ञ प्रा.ए.एस. पंचबुद्धे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
