वर्ष २००४ – ०५ या सत्रातील विद्यार्थ्यांची भरली पुन्हा शाळा….
शिर्ला :
रामुकृष्ण सावंत विद्यालय शिर्ला अंधारे येथील सत्र २००४-०५ वर्षातील पाचवी ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा स्नेह मिलनाचा कार्यक्रम तब्बल १९ वर्षानंतर मोठ्या थाटात पार पडला असून पुन्हा विद्यार्थ्यांना त्याच शाळेत,त्याच वर्गखोल्या आणि त्याच शिक्षकांसोबत दहावीचा २००४ -०५ या सत्रातील वर्ग पुन्हा भरला असून यावेळी आयोजित कार्यक्रमात स्नेह मिलन,मनोरंजक खेळ,तसेच स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला आहे.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श शिक्षक व मुख्याध्यापक मा.श्री. पी.जे.राठोड होते,तसेच कार्यक्रमाचे मुख्य आयोजक राजेश इंगळे सह प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.शाळेतील माजी मुख्याध्यापक बेलुलकर गुरुजी,माणिकराव जाधव,
रा.सा.विद्यालयातील विवीध सत्रातील माजी मुख्याध्यापक एस.एस.चिपडे, के.जी.सरकटे,
आर.पी.अंधारे ,बी.डी.चव्हाण, शिक्षक गजानन दैय्या, ओंकार उन्हाळे,अरविंद नाकट,चंद्रकांत वाघ,शिक्षीका ज्योती दांडगे,सौ बायस मॅडम,सौ.अंतकला मॅडम यांची उपस्थिती होती, कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक प्रेमदास राठोड यांनी दिपप्रज्वलन व प्रतिमा पुजन करुन केली,कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज हानोरे,सुत्रसंचालन राजकन्या मुंडे(गवरे),सुषमा कवलकार(वसतकार) यांनी केले.यावेळी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत हर्षदा आखरे (लांडे), संतोष वाडेकर,सुरज गवई,स्नेहल तायडे,विजय निमकंडे,राजेश इंगळे,प्रतिमा इंगळे,यांनी तसेच उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांनी व कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यांनी आपले मनोगत व्यक्त केले,कार्यक्रमाप्रसंगी आपण ज्या शाळेत शिक्षण घेऊन समाजात विवीध क्षेत्रात नाव उज्वल करत आहोत ते फक्त या शाळेमुळे आणि तेथील शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे अशी भावना ठेवून माजी विद्यार्थ्यांनी शाळेला विवीध शैक्षणीक व क्रीडा साहित्यांची भेट देऊन समाधान व्यक्त केले.
माजी विद्यार्थी व शिक्षक संगीत खुर्ची,लिंबु चमचा,अंताक्षरी अशा विवीध खेळात सहभागी झाले होते,कार्यक्रमाचे आभार प्रा.प्रसन्नजित वानखडे यांनी व्यक्त केले.यावेळी सर्व उपस्थित मान्यवर माजी विद्यार्थ्यांनी एकत्र स्नेहभोजनचा आस्वाद घेतला,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा.सा.विद्यालय येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी एम.के.राठोड,रजनी चक्रे,निशा राठोड,उमेश खिल्लारी,सागर कुटेमाटे,वैष्णवी थोरात,भिमराव जाधव आणि शाळेतील स्काऊट व गाईड पथकाचे विशेष सहकार्य लाभले.