उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र
पातुर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओ.बी.सी विभाग महाराष्ट्र प्रदेशची महत्त्वपूर्ण बैठक मुंबई येथील उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निवासस्थानी देवगिरी मलबार हिल संपन्न झाली यावेळी महाराष्ट्रातील नवनियुक्त पदाधिकारी जिल्हाध्यक्ष यांना नियुक्तीपत्र उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते देण्यात आले.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओ.बी.सी विभाग महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी मो. नजीब मो. हबीब यांचा सामाजिक कार्य पाहता यांची प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ध्येय धोरणानुसार मो.नजीब हे ओ.बी.सी विभागाच्या माध्यमातून पक्ष संघटन वाढविण्यासाठी काम करतील असा विश्वास व्यक्त करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
या वेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे ओ.बी.सी विभाग प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, प्रदेश समन्वयक ईश्वर बाळबुद्धे, अकोला जिल्हाध्यक्ष कृष्णभाऊ अंधारे, रामा अमानकर,पातूर शहरध्यक्ष करुज्जमा खान उपस्थीत होते मोहम्मद नजीब यांची नियुक्ती झाल्यानंतर पातुर शहरात त्यांच्या मित्र परिवारातर्फे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते तर्फे जुन्या बसस्थानकावर जल्लोष करण्यात आला.