पातूर प्रतिनिधी:-(संगीता इंगळे) पातुर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल येथे चिमुकल्या साहित्यिकांची मंदियाळी.जागतिक मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून पातूरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल येथे दुसरे मराठी बाल साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

या आगळ्यावेगळ्या साहित्य संमेलनात विद्यार्थीच बनले संमेलनाध्यक्ष,स्वागताध्यक्ष आणि उद्घाटक…!
या बाल साहित्य संमेलनातून विद्यार्थ्यांनी खऱ्याखुऱ्या साहित्य संमेलनाचा अनुभव घेतला.

यावेळी संमेलनध्यक्ष म्हणून विद्यार्थिनीं श्रावणी नाकट,उदघाट्क शालेय मुख्यमंत्री श्रावणी गिऱ्हे ह्या होत्या.तर स्वागतध्यक्ष म्हणून शालेय सांस्कृतिक मंत्री शर्वरी दळवे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी विशेष निमंत्रित साहित्यिक म्हणून अमरावती विद्यापीठ अभ्यास मंडळाच्या संचलिका प्रा.डॉ.ममताताई इंगोले,जेष्ठ संगीत तज्ञ प्रा.विलास राऊत,जेष्ठ साहित्यिक देवानंद गहिले, डॉ.शांतीलाल चव्हाण, अनिल दाते, नारायणराव अंधारे,कृष्णराव घाडगे,प्रा. शंकर गाडगे,नंदू ठक,छोटुभाऊ जोशी,मुकुंद कवडकर,प्रा.निलेश पाकदुने आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.तसेच शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे,कार्यकारी संचालिका सौ.ज्योत्स्ना गाडगे, मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे विचारपीठावर उपस्थित होते.
ग्रंथादिंडीने संमेलनची सुरुवात झाली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्व. तुकाराम बिरकड यांच्या स्मृती प्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या साहित्य दालनाचे उदघाट्न करण्यात आले. वऱ्हाडी कवी बाजीराव पाटील यांच्या नावाने साहित्य नगरींचे नाव देण्यात आले. तर जेष्ठ वऱ्हाडी कवी,लेखक दिवंगत निरंजन गवई यांचे नाव सभागृहाला देऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी परिसवांद, चर्चासत्र,कथाकथन व कविसंमेलन मध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. उदघाट्न सत्राचे संचालन संकल्प गाडगे तर आभार युवराज बंड याने मानले. यांनतर चर्चासात्र,परिसंवाद, प्रकट मुलाखत कथाकथन, कविसंमेलन आदी भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी होती. मराठी भाषेची थोरवी गाणारे नृत्य व नाटिकानी रसिकानाची मने जिंकली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे,मराठी विभाग प्रमुख नीतू ढोणे, संकल्प व्यवहारे यांच्यासह नरेंद्र बोरकर,बजरंग भुजबळराव,अविनाश पाटील,हरीश सौंदळे, रविकिरण अवचार,पंकज आवचार,प्रतीक्षा भारसाकडे,शितल गुजर, ऋतुजा अवचार,नेहा उपर्वट,नयना हाडके,स्वाती वालोकार,प्रियंका चव्हाण, पुजा खंडारे,प्रचाली थोराईत , रेश्मा शेंडे,इकरा अदिबा आलियार खान,योगिता शर्मा, अक्षय तायडे,नयना पटोले, रूपाली पोहरे,कल्पना वानेरे, शुभम पोहरे, मधुकर बोदडे आदींनी परिश्रम घेतले.
