पातुर तालुक्यातील चांन्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या उमरा या गावातील तिघा भावांना जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री बच्चन सिंह यांच्या आदेशाने एका वर्षाकरिता जिल्हाभरातून तडीपार करण्याचा आदेश पारित केला आहे. पातुर तालुक्यातील उमरा येथील विजय रामदास चंचरे वय 39 वर्ष, रामसिंग रामदास चंचरे वय 30 वर्ष, गजानन रामदास चंचरे वय 34 वर्ष सर्व रा. उमरा . यांच्यावर गुन्ह्यांची मालिका पाहता त्यांच्याविरुद्ध कलम 55 महाराष्ट्र पोलीस अधिनियमाने अकोला जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव करून जिल्हा परिषद अधीक्षक यांच्याकडे सादर केला होता यावरून 22 फेब्रुवारी रोजी माननीय जिल्हा अधीक्षक यांनी या तिघांना एक वर्षाकरिता हद्दपार केल्याचे आदेश पारित केले.गुन्हेगारी टोळयावर आळा बसणेकरीता टोळीने गुन्हे करणारी टोळी अकोला
जिल्हायातुन १ वर्षाकरीता हद्दपार मा. पोलीस अधीक्षक सा. श्री. बच्चन सिंह यांनी अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता रहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारी टोळयांची माहिती संकलीत करण्यात आदेश दिले असुन त्यांचे विरूध्द वरील प्रमाणे प्रभावी प्रतिबंधक कारवाई करणे सुरू आहे.” अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता राहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांवर येणा-या निवडणुका, आगामी सण उत्सव काळात एमपीडीए व इतर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे “असा इशारा जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी दिला आहे.
