आलेगाव प्रतिनिधी मो.इमरान
दिनांक १७ मार्च चां दिवस आलेगावातील नागरिक साठी धोकादायक नघाला एक नव्हे दोन नव्हे तर सतत एकाच दवसात आलेगावतील १२ जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने गावात एकच खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार १७ मार्च रोजी एक एक करून सलग १२ पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या रोगण आलेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर येत होते ज्या मुळे आरोग्य केंद्रावर एकच खळबळ माजली होती सतत पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याची बातमी गावात वाऱ्या सारखी पसरली व गावातील नागरिक हातात लठ्या काठ्या घेऊन पिसाळलेल्या कुत्र्यांचा शोध घेत होते तरी पिसाळलेला कुत्रा नागरिकांच्या हाती लागला नसून गावभारात पिसाळलेल्या कुत्र्याची एकच दहशत पसरलेली आहे,पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या रोगणान मधून तीन ते चार रुग्णांना अकोला येथील दवाखान्यात उपचारा साठी पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली,मागील दोन ते तीन महिन्या पूर्वी ही आलेगाव येथे एकाच दिवसात ७ ते ८ नगीकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता तरी आज रोजी पिसाळलेला कुत्र्याने जवा घेतलेल्या एकूण रुग्णांची संख्या मागील दोन महिन्यात २० वर पोहोचली आहे तरी ही ग्रामपंचायत गावातील मोकाट फिरणाऱ्या कुत्र्याचे बंदोबस्त करण्यासाठी तय्यार नसल्याचे गावातील नागरिकांकडून बोलले जात आहे.
दोन महिन्यात २० जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला.
मागील दोन महिन्यापूर्वी सुद्धा एकाच दिवसात ७ नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता आणि आज सुद्धा एकाच दिवशी पिसाळलेल्या कुत्र्याने १२ जणांना जवा घेतल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे तरी मागील दोन महिन्यात फक्त दोनच दिवसात २०जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला आहे .
जवाबदार कोण ?
मागील दोन महिन्यापूर्वी पिसाळलेल्या कुत्र्याने एकाच दिवसात ७ जणांना चावा घेतला होता तरी संबंधित विभागने कोणतीच उपाय योजना केली नाही,जर गावतील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला असता तर आज एवढ्या मोठ्या संख्येत पिसाळलेल्या कुत्र्याने नागरिकांना चावला नसता अशी प्रतिक्रिया पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या रुग्णांचे पालक व नातेवाईक देत आहे.
अशी घटना पुनः घडू नये.
अशी घटना पुनः घडू नये यासाठी संबंधित विभागाने योग्य पाऊले उचलावीत व गावत मोकाट फिरणाऱ्या कुत्र्याचे बंदोबस्त करावे अशी मागणी करण्यात येत आहे.
शाळकरी विद्यार्थि व लहान मुलांना एकटे बाहेर पडू देवू नये.
काही नागरिक चर्चा करत होते की एकच दिवसात इतक्या मोठ्या संख्येत एका पिसाळलेल्या कुत्र्याने नागरिकांवर हल्ला करून चावला आहे तरी शाळेत जाणारे विद्यार्थि व घरा बाहेर खेळणारे लहान मुलांना सुद्धा एकटे बाहेर पडू देवू नये कारण पिसाळलेला कुत्रा कुठून ही या मुलांवर हल्ला करून गंभीर जाखमी करू शकतो तरी शाळकरी विद्यार्थि व लहान मुलांना एकटे घरा बाहेर पडू देवू नये अशी चर्चा होत आहे
आपल्या मुक्या प्राणांची काळजी घ्यावी.
गावात दिवसेंदिवस मोकाट फिरणारे कुत्रे पिसळत असून घरा समोर बांधलेले व गोठ्यात बांधलेले मुक्या प्राण्यांना सुरक्षित जागेवर बांधा,कारण पिसाळलेला कुत्रा नागरिकांच्या अंगावर चावण्या साठी धावत असून जनावरांना सुद्धा चावत आहे तरी आपल्या मुक्या जनावरांना सुरक्षित जाग्यावर बांधण्याची वेव्स्था करण्याची सुज्ञ नागरिकांकडून बोलले जात आहे.
यावर तात्काळ कारवाई करून मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करण्यात येईल
गोपाल गणपतराव महल्ले
सरपंच आलेगाव़ ग्रा, पं