पातुर तालुक्यातील बोडखा येथील परिसरात बिबट्याने एक वासरी तीन दिवसा अगोदर फस्त केली होती. या बिबट्याचा या परिसरात मोठ्या प्रमाणात वावर असून या बिबट्यामुळे शेतकरी वर्गात व गावकऱ्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे काल रात्री पातुर वाशिम महामार्गावरील बोडखा नजीक पेट्रोल पंपाजवळ रात्री नऊ वाजताच्या दरम्यान बिबट्या हा महामार्गावरून जाताना वाहनधारकांना दिसला या बिबट्याला मोबाईलच्या कॅमेऱ्यात छायाचितीत करण्यात आले या बिबट्याच्या अति वावरामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पशुधन पालक चिंता तूर असून या गावातील गुराख्याने जंगलात गुरेचरण्यास टाळले असून गोधन पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे या परिसरातील शेतामधील गोठ्यामध्ये जनावर असुरक्षित झाले असून वन विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}