पातुर बाळापूर मार्गावर मोठी बाजारपेठ असून या ठिकाणी तालुक्यातील नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात वर्दळ असते या महामार्गावर अवैध वाहतूक करणारे वाहने हे रस्त्याच्या बाजूला उभ्या केल्याने पातुर बाळापूर महामार्गावर नियमित ट्राफिक जाम होतो.

या ठिकाणी अनेक वेळा अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे तसेच या वाहतुकीवरून दोन समाजात अनेक वेळा भानगड उपस्थित झाली. याबाबतची माहिती अनेक वेळा ठाणेदार यांना दिली असता त्यांनी कारवाई करण्याची आश्वासन दिले होते. पातुर पोलीस स्टेशनला वाहतूक विभागामध्ये चार ते पाच कर्मचारी तैनात असून त्यांच्याकडे नेमके कोणते काम आहे हे कोडे पातुरवासियांना पडले आहे. पातुर बाळापूर महामार्गावरील अवैध ऑटो, काली पिली, मारुती व्हॅन हे वाहनधारक नेहमी महामार्गावर रस्तावर अडथळा निर्माण करतात. या वाहनधारकांचे संबंध वाहतूक विभागाशी असल्याने त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कार्य होत नसल्याने ते मनमानी आपले वाहने उभी करून वाहतूकीला अडथळा करतात या गंभीर बाबीकडे पातूरचे लोकप्रिय लक्ष्मीपुत्र ठाणेदार लक्ष देतील काय असा नागरिकांचा प्रश्न पडला आहे