आगामी मान्सुन काळात अकोला जिल्हयात जास्तीत जास्त वृक्ष लागवडीचे ध्येय समोर ठेवुन मा. श्री. बच्चन सिंह, पोलीस अधीक्षक, जि. अकोला यांचे संकल्पनेतुन तसचे मा. श्री. अभय डोंगरे अपर पोलीस अधीक्षक जिल्हा अकोला व सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी बाळापुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन चाग्नी येथे स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक श्री. शंकर शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत व सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री. विजय चव्हान यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस स्टेशन चान्नी परिसरात वृक्षारोपनाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच उपस्थितांना लागवडी करिता वृक्ष वाटप करण्यात आले. तसेच पो.स्टे. धान्नी हद्दीतील ग्राम विवरा येथील पोलीस पाटील श्री. भुजंगराव देशमुख यांनी आपल्या पोलीस पाटील पदाचा नियमित कार्यकाळ पूर्ण करूण सेवानिवृत्त झाल्याने त्यांचे कामाची पावती म्हणुन त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम घेवुन पोलीस पाटील श्री. भुजंगराव देशमुख यांचा सत्कार सह कुटुंबासह करण्यात आला.
कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक श्री. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला, सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री. विजय चव्हान प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन चान्नी पोलीस उपनिरीक्षक श्री. संजय कोहळे, जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष श्री. निरंजन पारवे तसेच पोलीस स्टेशन परिसरातील पोलीस पाटील व पोलीस स्टेशन चाव्नी येथील पोलीस अंमलदार व ग्राम विवरा येथील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}