चला व्यवस्था समजून घेऊ या अभियानाला सुरुवात
एसपी इंस्पेक्शन नंतर विद्यार्थी जागरूकता अभियान
पुस्तकी शिक्षणासोबतच व्यावहारिक शिक्षण महत्वाचे आहे हा धागा पकडून एज्युवीला पब्लिक स्कूल च्या मुख्याध्यापिका विद्या निलेश गाडगे यांच्या संकल्पनेतून चला व्यवस्था समजून घेऊ अभियानाची सुरुवात पातूर पोलीस स्टेशन पासून झाली.

पुस्तकी शिक्षणासोबतच व्यावहारिक शिक्षण फार महत्वाचे आहे पोलीस विभागाची रचना कशी आहे?

पोलिस विभाग काम कसे करतो, पोलिसांची कार्यपद्धती कशी,पोलीस दलात किती व कोणत्या शाखा काम करतात,कमी मनुष्यबळात पोलीस कसे काम करतात ,पोलिसांच्या मदतीला कोण असत,पोलिसांची भीती कोणाला वाटावी,अश्या एक नव्हे अनेक प्रश्नांचे निरासरण पातूर पोलीस स्टेशन चे प्रभारी पोलीस निरीक्षक किशोर शेळके व त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक अभिषेक नवघरे ,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटे,

सहाय्यक पोलीस ए एस आय अरविंद पवार,पोलीस हवालदार हिम्मतराव डिगोळे, ए एस आय गजानन पाचपोर,शरद साबे,
पोलीस अंमलदार अभिजित असोलकर, महिला पोलिस गोकुळा सोळंके ,महिला गृहरक्षक सुनिता इंगळे यांनी पी एस ओ कामकाज गोपनीय विभाग, स्टेशन डायरी,क्राईम विभाग, गुन्हे अन्वेषण ,लॉक उप, मालखाना ,शस्त्र विभाग ,वायरलेस विभाग,या सर्व शाखांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.

चला व्यवस्था समजून घेऊ अभियान यशस्वी करीता एज्युविला पब्लिक स्कूल च्या मुख्याध्यापिका विद्या निलेश गाडगे,शिक्षिका सोनू वाणी,प्रतिभा अंधारे,सुषमा इनामदार,अनुराधा कराळे यांनी परिश्रम घेतले.
पोलीस आमचे मोठे भाऊ आहेत .आपल्याला आजार झाला की आपण डॉक्टर कडे जातो तसेच समाजातील सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना वठणीवर आणायला समाजाचे डॉक्टर पोलीस आहेत आता आम्हाला पोलीस स्टेशनची व पोलिसांची भीती नाही वाटत ती तर गुंडांना वाटायला पाहिजे. आमचेकडे इमर्जन्सी नंबर 112 आणि 1098 आहे.आजपासून आम्ही पण सध्या वेशातील पोलीस आहोत